भाजपच्या वतीने बाजार भावापेक्षा कमी दरात दिवाळी फराळाचे सामान उपलब्ध करून देण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

सुनील पाटील.

दीपावली सणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावा पेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

आज(दि. २९) या उपक्रमाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथे करण्यात आले. यावेळी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, जिल्हा परिषेदच्या माजी महिला व बाल कल्याण सभापती प्रिया मुकादम, प्रकाश शेलार, अमर ठाकूर, शितू शर्मा, प्रकाश मुंबईकर, संदीप भगत, जमीर शेख, शितल कदम, दुर्गावती सहानी, प्रणाली यादव, विद्या परांडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दिवाळी निमित्त कामोठे, कळंबोली, खारघर, या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे तर नविन पनवेल येथील नगरसेवक संतोष शेट्टी यांचे जनसंपर्क कार्यालय असे एकूण चार ठिकाणी दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये रवा, मैदा, चणाडाळ, साखर, पोहे, गुळ, डालडा आणि गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post