निमिषा थवईचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
३२ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट तलवारबाजी स्पर्धेमध्ये पनवेलच्या निमिषा थवई हिने कांस्य पदक पटकावून नेत्रदिपक कामगिरी केली.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत निमिषा थवई (वय १५) हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर खुल्या गटामध्ये फॉइल या प्रकारात कांस्य पदक मिळविले. त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी निमिषा हिचे कौतुक करून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक, इतर मान्यवर तसेच प्रशिक्षक मिलिंद ठाकूर व वैभव पेटकर उपस्थित होते
Tags
रायगड जिल्हा