प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनिल पाटील :
उच्च शिक्षण घेण्यासाठी पनवेलमधील अक्षता सुरेश गीध हिला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ०१ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरच्या मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (दि.२६ ) डॉ. अर्चना बाथम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
अक्षता सुरेश गीध हि विद्यार्थिनी विले पार्ले येथील बीएनसीपी कॉलेजमध्ये एम फार्मा शिक्षण घेत आहे. या उच्च शिक्षणासाठी तिला आर्थिक मदतीची गरज होती. त्या अनुषंगाने तिच्या पालकाने केलेल्या मागणीनुसार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल या सेवाभावी संस्थेच्या वतीने ०१ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.