समस्त गुळसुंधा प्रभाग व कोन सावळा रस्त्यावरून. प्रवास करणारे सर्व ग्रामस्थ, काल गुळसुंधा प्रभागातील सत्ताधारी पक्षाचे, एकदाचे बिनबुडाचे आंदोलन

 कंपनीच्या मुळाला, खतपाणी घालणारा भ्रष्टाचारी, जिल्हापरिषद यां दोघावार कायदेशीर कारवाई होत नाही,तोपर्यंत कोन सावळा रस्त्याचे सुखकर प्रवासाचे सुख क्षणभंगुर असणार आहे





प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :


सार्वजनिक बांधकाम खाते, आता जोरदार कामाची सुरवात करून, २०२२ च्या पावसाळ्या अगोदर, कोन सावळा रस्त्यावरून पावसाळ्यात प्रवास करणाऱ्या, ग्रामस्थांचा त्रास नारपुली गावापार्यंत तरी खात्रीशीर संपवणार आहे.

असे सर्व गुळसुंधा जिल्हापरिषद मध्ये राहणारे ग्रामस्थ गृहीत धरत असतील, पण तसे अजून तरी शक्य नाही. त्याला कारण म्हणजे, गुळसुंधा प्रभागातील, सर्व बेकायदेशीर रित्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्याना,मर्यादपेक्षा जास्त मालाची अवजड वाहनाकडून वाहतूक करण्यासाठी, कुठच्याही प्रकारचे मोजमाप न करता तटपुंजी घरपट्टी, नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करण्यासाठी व इतर कारणासाठी आपला स्वतःच्या आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी,बेकायदेशीर ना हरकत दाखले देऊन, माजोरी बनवलेल्या कंपन्याच्या बेकायदेशीर चालनाना वाव देण्यासाठी या कंपनीच्या मुळाला, खतपाणी घालणारा भ्रष्टाचारी, जिल्हापरिषद   यां दोघावार कायदेशीर कारवाई होत नाही,तोपर्यंत कोन सावळा रस्त्याचे सुखकर प्रवासाचे सुख क्षणभंगुर असणार आहे.

 सोमाटणे ग्रुप ग्रामपंचायत मधील काही ग्रामस्थ म्हणून चालणार नाही, आता सर्वच ग्रामस्थ १००% जागृत होऊन, गुळसुंधा प्रभागामध्ये वेग वेगळ्या राजकीय पक्षाची सत्ता असलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधिकडे धाव घेऊन, गुळसुंधा प्रभागामध्ये क्षणभंगूर ठरणारे सुख कायमस्वरूपी करून,सुवर्णं क्रांती आणण्यासाठी जिवतोड प्रयन्त करीत आहे.परंतु गुळसुंधा प्रभागातील सर्व जन सामान्यांचे जळवासारखे रक्त पिणारे, सर्व राजकीय पक्षाचे रक्त पिपासू लोकप्रतिनिधी,या कंपनीचा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालण्यासाठी,या कंपनी विरोधातील निवेदन घेऊन जाणाऱ्या, प्रत्येक ग्रामस्थांला निर्लज्य पणाचा कळस आणून, आपण १५ वर्षांपासून झोपेत होता,

 त्यामुळे आता आम्हाला काही करता येणार नाही अशी निडर पणे उत्तरे देऊन, लोकप्रतिनिधी बनण्याचा हेतू साध्य झाल्यावर, या मतलबी विद्यमान लोकप्रतिनिधी साठी निवडणूक पूर्वी,जीवाचे रान करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या तोंडाला पाने पुसत आहे.

               तरी गुळसुंधा प्रभागातील सर्व विद्यमान लोकप्रतिनिधी व त्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळीना सांगणे आहे की, केंद्राचा असो  किंवा राज्य शासनाचा विकास निधी असो, हा प्रत्येक नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू खरेदीतून जवळ जवळ ५०% करातून तयार केलेला असतो, तो तुमच्या बाप जहागीरतून आलेला नसतो. त्यामुळे विकामाची प्रसिद्धी म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या करातून केलेले विकास कामाचे नियोजन,एवढाच हक्क आपल्या प्रसिद्धीचा आहे. त्यामुळे भानावर या गुळसुंधा प्रभागातील मतदार मेलेल्या आईचे दुध प्यायले नाही.

आणि आता विधात्याने ठरवल्याप्रमाणे रक्त पिपासू भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीना संपवण्यासाठी कोविड महामारी नंतर आता मतदार जागृती महामारी येणार आहे.आणि त्यासाठी जिवरक्षक यंत्र (व्हेंटिलेटर ) पण फोल ठरणार आहे. आणि त्यामुळे राहिला प्रश्न आमच्या अडी अडचणींचा, त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, आणि मुख्यमंत्री बघतील, आणि त्यानी पण आमच्या अडी अडचणींच्या प्रश्नाचं समाधान नाही केल्यास, शेवटी माजोरी बनलेल्या कंपन्या व त्याला खतपाणी घालणारा, जिल्हापरिषद  याच्या विरोधातील भ्रष्टाचारी पुराव्याला, न्यायदेवता १००% न्याय देईल.

त्यासाठी गुळसुंधा प्रभागातील ग्रामस्थांबरोबर सैन्यदलात सेवा बजावलेल्या सुभेदार कै वसंत गोविंदराव शिंदे यांच्या मुलीची न्याय देवतेपर्यंत, निस्वार्थी लढण्याची जिगर आहे.त्यामुळे आता गुळसुंधा प्रभागातील सर्व मतदारांना, मेलेल्या आईचे दूध न पिल्याची, विद्यमान लोकप्रतिनिधीना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीपूर्वी मतदात्याने दोन पाच हजाराच्या नोटे साठी मत दान करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच्या तोंडावर त्याच्या दुप्पट नोट्टा फेकून त्या लोकप्रतिनिधीचे तोंड काळे करून,एकविरा आई तसेच सोमजाई आईची लेकरं असल्याचे सिद्ध करा.

सौ माही मिलिंद मानकामे.

    कोन सावळा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणावरून प्रसिद्धी मिळवण्यासाठी, वेगवेगळ्या पक्षा पक्षाच्या झोॅब्या चालू झाल्या आहेत. खरे तर कोविड काळात सुद्धा ५ कोटीच्या, कोन ते नवखार कंपनीच्या रस्त्याच्या विकास कामाची मंजुरी मिळवण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियन्ता, जिवतोड प्रयत्न करून सुद्धा प्रसिद्धी पासून उपेक्षित राहत आहे.आणि अशी पद्धत भारतीय लोकशाही मध्ये राजकीय नेत्यांनी नेहमीची रुजवत आणली आहे.तरी पण सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या राजकीय वैमन्यासातून, एखाद्या शासकीय खात्याचे विकासकामस थोडा विलंब झाला, 

तर त्या अधिकाराच्या तोंडाला काळे फासायला सुद्धा हे राजकीय नेते मागे पुढे पाहत नाही. एकंदर सर्व सामान्यजनतेच्या, जीवनावशक वस्तू खरेदितील ५०% जमा झालेल्या करातून, अशा प्रकारचे विकासकाम पूर्णतवाला येते. त्यामुळे खरे श्रेय ५०%कर भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे आहे. आणि शासनाचे पगारदारी लोकप्रतिनिधी यांनी विकासकामाचे नियोजन केल्याने, अंशता श्रेय असणे साहजिक आहे. मग या पगारदारी लोकप्रतिनिधीची अंशता श्रेयासाठी झोंबा झोंबी का? तसे पाहिलेतर शासकीय पगारदारी अभियंता अशा झोंबा झोंबीत सामील होत नाही. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांना सांगणे आहे की, ज्या कोन सावळा रस्त्याच्या दुर्दैशेला व २० कोटीचा भुर्दंड पाडणाऱ्या, गुळसुंधा जिल्हापरिषद प्रभागातील कंपन्यावरती कारवाई करून, ज्यांनी कोणी या कंपन्याना बेकायदेशीर व्यवसायला चालना दिली, त्या राजकीय नेत्याकडून शासनाला झालेला २० कोटींचा भुर्दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी, झोंबा झोंबी करून श्रेय प्रसिद्धी घ्या. त्यामुळे खरोकर सर्व सामान्य जनता आपल्याला रहिवाशाचे लोकप्रतिनिधी मानेल.


सौ माही मिलिंद मानकामे

Post a Comment

Previous Post Next Post