प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 'स्नॅपशॉट फोटोग्राफी २०२१' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी मोबाईल फोटोग्राफी आणि कॅमेरा फोटोग्राफी असे दोन गट असून 'ये दिवाळी शांती वाली', 'दिवाळी थ्रू माय लेन्स', व 'स्वदेशीचा प्रचार' हे तीन विषय असणार आहेत. हि स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाश्यांसाठी असून नाव नोंदणीची अंतिम तारीख १० नोव्हेंबर आहे. स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ६० हजार रुपयांची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ७७५७०००००० या क्रमांकावर संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सभागृहनेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.