वाहतूक नियंत्रण विभाग नवी मुंबई विना हेल्मेट वाहन चालक आणि वाहन स्वार यांच्यावर सक्त कारवाई होणार




प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनिल पाटील :

मागील काही दिवसापासून रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या  अपघाताच्या वाढते प्रमाण लक्षात घेऊन दुचाकी वाहन चालक तसेच पाठीमागे बसणारी व्यक्ती यांनी हेल्मेट परिधान करणे आता अपरिहार्य आहे . त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दी मध्ये दिनांक एकोणतीस दहा दोन हजार 21 विशेष मोहीम राबवून विना हेल्मेट चालकावर तसेच मागे बसलेली व्यक्ती यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे या द्वारे सर्व जनतेस आव्हान करण्यात येतो की दुचाकी चालवत असताना मागे बसलेली व्यक्तीने हेल्मेटचा वापर करावा . सुरक्षित प्रवास करावा असे पोलीस उपायुक्त वाहतूक नवी मुंबई श्री पुरुषोत्तम कराड यावेळी त्यांनी लेखी स्वरूपात सर्व टू व्हीलर वाहनचालकांना व पाठीमागे बसलेले व्यक्ती यांना सुचित केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post