प्रेस मीडिया वृत्तसेवा :
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
दीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 'पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.
या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाश्यांसाठी आहेत. ७ वर्षाखालील, ८ ते १५ वर्षे, १६ ते २१ वर्षे, तसेच २२ वर्षावरील अशा चार गटात या स्पर्धा होणार असून 'ध्वनी प्रदूषण', 'ये दिवाळी शांतीवाली' आणि 'वोकल फॉर लोकल', हे तीन विषय या स्पर्धेसाठी आहेत.
स्पर्धेत नाव नोंदणीची अंतिम तारीख १० नोव्हेंबर असून अधिक माहितीसाठी ७७५७०००००० या क्रमांकावर संपर्क साधावा. पोस्टर स्पर्धेतीत एकूण विजेत्यांना ३५ हजार तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ३५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेचे सभागृहनेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.