आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे पनवेल नगरी मध्ये केले स्वागत.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जि. प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी रायगड जिल्ह्यात जनसंवाद यात्रा मंगळवारी आयोजीत करण्यात आली होती. या यात्रेचा सामरोप पनवेल मध्ये झाला. या वेळी छत्रपती संभाजीराजे यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल नगरीमध्ये मध्ये स्वागत केले. यावेळी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सभेत मराठा आरक्षणासाठी लॉंग मार्च काढला जाईल असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य शासनाला दिला.

 सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असा निकाल दिल्यानंतर पुन्हा या लढ्याला सुरुवात कारावी तसेच मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी रायगडच्या पवित्र भुमीमधून छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा मंगळवारी आयोजीत करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप पनवेल शहरामध्ये झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, मराठा समाज राज्य समन्वयक विनोद साबळे, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवानेते हॅप्पी सिंग, कामोठे युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत आद्य क्रांतीवीर वासु�

Post a Comment

Previous Post Next Post