प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे दि १२, पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर रिक्शा स्टॅण्ड अंधारात व त्या ठिकाणी अजून प्रीपेड सेवा सुरू करण्यात आलेली नाही, पुणे रेल्वे स्थानक वर मागच्या वेळी जी अमानवीय घटना घडली होती एक अल्पवयीन मुलीवर बलात्कारची त्या वेळी अस सांगण्यात आले होते की लवकरच पुणे स्थानक वरून प्रिपेड रिक्शा सेवा पुन्हा चालू केली जाईल परंतु ती अद्याप चालू झालेली दिसत नाहीये. ,
पुणे रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वार त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी उभे राहणारे रिक्शा चालक म्हणाले की प्रीपेड रिक्शा इथे नाही मुख्य प्रवेशद्वार जा त्या ठिकाणी चौकशी केली असता प्रीपेड सेवा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. या मूळे प्रवासी लोकांचे हाल होत आहेत , ज्या ठिकाणी पार्किंग चा गेट आहे तिथे स्थानकात रिक्शा स्टॅण्ड आहे रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी अंधार आहे, रेल्वे प्रशासनाने तिथे दिवा लावला पाहिजे.
पार्किंग वाल्यांची मनमानी आणि अरेरावी...
पार्किंग मध्ये गाडी दहा मिनिटे उभी केली असता तोंडी वीस रुपयांची मागणी केली जाते, जर पावती मागितली तर त्या पावती वर गाडी नंबर व वेळ न टाकता अर्धी फाडून कोरी पावती हातात दिली जाते, एवढे पैसे कशाला असा प्रश्न विचारला की आरेरावीची भाषा वापरली जाते .
मागच्या वेळी अशी भयावह घटना घडली तरी प्रशासन जागा होत नाही प्रीपेड सेवा उपलब्ध नाही स्थानकात रिक्शा स्टॅण्ड अंधारात अशा परिस्थितीत जर कुठली अप्रिय घटना घडल्यास त्याला जवाबदार कौन..??? कुठली ही घटना घडली तर त्यावेळी फक्त तोंडी आश्वासने दिली जातात पण नंतर कोणतेच ठोस उपाय योजना करण्यात येत नाही हे पुणेकरांचे दुर्भाग्यच म्हणाव लागेल.