मार्केटयार्ड परिसरातील असलेल्या एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे शहराच्या मार्केटयार्ड परिसरातील असलेल्या एका फर्निचरच्या गोडाऊनला साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण अशी मोठी आग लागली.  गोदामात फर्निचरची लाकडी सामग्री असल्यामुळे आगीणे विक्राळ रूप धारण केले अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. तब्बल बारा वाहनांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मार्केटयार्ड परिसरात अनेक दुकाने आहेत. जवळच भुसार मार्केट असल्यामुळे याच परिसरात अनेक मोठमोठी गोडावून देखील आहेत. याच परिसरातील आई माता मंदिराजवळ फर्निचरचे एक मोठं गोडावून आहे. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी आणि प्लास्टिकचे फर्निचर असल्यामुळे पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.

अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल बारा गाड्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु अद्याप तरी ही आग विझवण्यात यश आले नाही. या गोडाऊन शेजारीच इतरही गोडावून असल्यामुळे आग इतरत्र पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.नुकसान व आगीचे कारण बद्दल माहीती मिळाली नाही 



*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post