प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुण्यात संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे मनपाच्या वतीने घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून हेल्पलाईन नंबरही दिला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे पुण्यात अचानक वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.काही भागांमध्ये पाणी साचले आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान घातले आहे. IPL 2021 : एमएस धोनीने जिगरी दोस्तालाच केलं बाहेर, CSK चा कठोर निर्णय' हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात.
पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा' असं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुणे रेल्वे स्थानक परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांचे अतोनात हाल झाले आहे. पालिका प्रशासनाने सुद्धा घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत. या मुसळधार पावसात झाडे कोसळण्याची, जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे.
लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रायगड जिल्ह्यांत तीव्र ते अत्यंत तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाबाबत माहिती देणारे ट्विट्स भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी केले आहेत.येत्या दोन-तीन तासांत पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत. या मुसळधार पावसात झाडे कोसळण्याची, जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.