केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आज महानगरपालिकेत येणार

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे  : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुणे महानगरपालिकेने आरोग्य सुविधांसाठी मोठे काम केले. दोन जम्बो रुग्णालय उभारण्यासह महापालिकेच्या रुग्णालयांचे सक्षमीकरण केले. आॅक्सिजन प्लांट उभारले, खासगी रुग्णालयात बेड न मिळाल्याने, आॅक्सिजन संपल्याने आणीबाणीच्या स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दुसऱ्या लाटेत शहरात रोज हजारो रुग्ण सापडत असताना अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेने आता तिसऱ्या लाटेसाठी सुद्धा तयारी करून ठेवली आहे. याचाच आढावा घेण्यासाठी डॉ. भारती पवार सोमवारी  महापालिकेत बैठक घेणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम व तिसऱ्या लाटेसाठी असलेली तयारी याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आज महापालिकेत येणार आहेत.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post