प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे चाकण परिसरात दि ३ रोजी गुटखा विक्री आणि पुरवठा तसेच साठा करून ठेवण्यासाठी जागा पुरविल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी महाळुंगे येथे कारवाई करत 5 लाख 17 हजार 845 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिलाल उद्दीन तालुकदार वय ४२, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड. मूळ रा. आसाम, रामाराम कर्नाराम चौधरी वय २५, रा. खालुम्ब्रे, संतोष शर्मा, अरुण इंगवले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक अनिल महाजन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तालुकदार याने त्याच्या घराजवळील खोलीत गुटख्याची साठवणूक केली. अंजुम पान स्टॉल टपरीमध्ये गुटख्याची विक्री केली. याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून पाच लाख १७ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी रामाराम आणि संतोष या दोघांनी तालुकदार याला गुटखा पुरविला. तर आरोपी अरुण याने त्याची एक खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. हल्ली शहरातील विविध ठिकाणी गुटका विकणाऱ्या वर कारवाही चालू आहे, तरी शहरात्त बंधी असताना ही गुटका विकला जातो आणि टपरी धारक ही छुप्या रीतीने गुटख्याची विक्री करतात संबंधित असलेल्या विभागीये प्रशासनाने या वर कठोर पाऊलं उचलायला हवंय, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.