प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : मुळा-मुठा नदी किनारी असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात अतिक्रमण करून शेकडो-हजारो ट्रक राडारोडा टाकून येथील नालाही बुजवण्यात आला आहे.
अभयरण्याची जैवविविधता धोक्यात आल्याने या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
येरवडाभागातील अतिशय जैवविविधतेने नटलेले हरित पट्टा म्हणजे डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्यात सुमारे ११० विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात. डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांसाठी अधिवास आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि कच-याचे साम्राज्य यामुळे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे
शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार सुनील टिंगरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी आंदोलनकर्त्यांसमवेत अभयारण्याची पाहणी केली. अधिका-यांनी त्वरित कारवाईची पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*