पुणे महानगर पालिकेवर भगवा फडकवण्याची संधी द्यावी ....आमदार नीलमताई गोरे.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

पुणे महानगरपालिके मध्ये भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. राज्यात देखील शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे नागरिकांनी सर्व सामान्यांची कामे करणाऱ्या शिवसेना पक्षाला या वेळी पालिकेवर भगवा फडकवण्याची संधी द्यावी असे विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलमताई गोरे यांनी सांगितले.

बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे शिवसेनेच्या वतीने उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या माध्यमातून दोन हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या

या वेळी रवींद्र मिर्लेकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांमध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडली आहे त्याच प्रमाणे पुण्यात देखील शिवसेनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांना मदत करत कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत.

संपर्कप्रमुख सचिन आहिर म्हणाले, मुंबई प्रमाणे पुणे शहरामध्ये देखील शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी सर्व नेते उभे आहेत. बाणेर बालेवाडी भागांमध्ये शिवसैनिक जनसेवेच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा आवाज शिवसेना होत आहे.

यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर , संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, शिवाजी बांगर, संतोष मोहोळ, ज्योती चांदेरे , युवा सेनेचे राज्य सरचिटणीस किरण साळी, संजय बांगर ,संतोष तोंडे, महेश सुतार आदी उपस्थित होते.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post