प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : लोकांना प्लॅन ए आणि प्लॅन बी नुसार ‘लोन कोई भी लो, ई एम आय हम देंगे’ तसेच ‘नो लोन नो ई एमआय’ असे सांगून २२.८५ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकविसाव्या शतकात, प्रगती शील शहर सुशिक्षित नागरिक तरी कसे काय लुबाडले जातात ? तर लालसापोटी ! नागरिकांना सतर्कतेचा जणू विसरच पडलेला आहे ऑगस्ट २०१९ ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान स्विमिंग टँक रोड, जुनी सांगवी येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी संगिता अनिल कदम वय ४९ रा. आळंदी रोड, पुणे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतिश अंकुश कांबळे संगमनगर, जुनी सांगवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शिवकांता सेल्स इंडिया प्रा. लि ही कंपनी स्थापन केली. त्यांनी लोकांना प्लॅन ए ‘लोन कोई भी लो, ईएमआय हम देंगे’ म्हणजे कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर वस्तू घ्या त्या वस्तूचे ५०% टक्के रक्कम मला द्या आणि उरलेल्या रक्कमेचे हफ्ते मी भरणार.
तसेच प्लॅन बी ‘नो लोन नो ईएमआय’ यामध्ये कोणतीही वस्तूची ७० टक्के रक्कम मला द्या आणि ३५ दिवसानंतर त्या दुकानात जाऊन सगळे पैसे मी स्वत: भरून ती वस्तू तुम्हाला घेऊन देतो असे सांगितले. आरोपीने फिर्यादी यांची २२ लाख ८५ हजार ७०० रूपयांची फसवणूक केली. तसेच याच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.