पेट्रोल , डिझेलच्या रोजच्या दरवाढीच्या विरोधात बैलगाडीवर टू व्हिलर ठेवत प्रवास करून मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

पेट्रोल व डिझेल  भाव वाढीच्या विरोधात  आंदोलन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले..


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे दि २१ पेट्रोल व डिझेल  भाववाढीच्या विरोधात आज आंदोलन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

देशाला महागाईचे कारण देवून सत्ता काबीज केलेल्या मोदी सरकारनेच मात्र आता जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. पेट्रोल व डिझेल च्या भाववाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन भाजपच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला.

पेट्रोल व डिझेल ची किंमत दररोज वाढत आहे. ११२ रुपये पेट्रोल झाले आहे तर डिझेलने सुद्धा शंभरी ओलांडली आहे. तेलांच्या दररोजच्या या दरवाढीच्या विरोधात बैलगाडीवर टू व्हिलर ठेवत प्रवास करून मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप, नगरसेविका सौ.सायलीताई वांजळे, युवक प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश कामटे, मयूर गायकवाड, महेश हांडे, मनोज पाचपुते, अब्दुल हाफिज, किशोर कांबळे, रुपेश संत, शरद दबडे, अविनाश भांड, किरण खैरे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे यांच्या सह पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन वाढत्या दरवाढी बद्दल मोदी सरकारचा निषेध नोंदवला.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post