प्रेस मीडिया वृत्तसेवा :
वाघोली – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर व इतर यांच्या प्रयत्नातून वाघोली तालुका हवेली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 30 दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कदमवाक वस्ती फुरसुंगी गणातील भाजपाचे पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
तर वाघोली तालुका हवेली येथे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली गावचे माजी उपसरपंच समीर भाडळे,विद्यमान उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे,वंदना दाभाडे, तंटामुक्ती माजी अध्यक्ष प्रमोद भाडळे, वाघेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष चैतन्य सातव,उद्योजक सागर जाधव,निखिल भाडळे,सुशिल जाधव,संतोष (जाॅन) तांबे,भारत सातव,दिलीप काळे,श्रीधर भाडळे,लखन भाडळे,दिपक बढे,विशाल शिंदे,सनी अन्सारी,अजित सातव,रोहित शिंदे,प्रणय सातव,आसिफ शेख,ज्ञानेश्वर तांबे,मोसीम शेख,घनश्याम सातव,सचिन नवले,अतुल बनकर,प्रमोद भाडळे,युवराज भाडळे,प्रतिक तांबे,गफार शेख,स्वप्निल वराळे,सदानंद तुपे,ज्ञानेश्वर लबडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी राहुल चोरघडे, प्रकाश हरपळे, सनी काळभोर, किरण हरपळे, आश्वित काळभोर, मयूर हरपळे, माजी सरपंच माणिक सातव पाटिल,सरपंच वसुंधरा उबाळे,माजी उपसरपंच राजेंद्र सातव,माजी उपसरपंच कैलास सातव, संदेश आव्हाळे, योगेश शितोळे, माजी सरपंच शिवदास उबाळे,बाळासाहेब सातव (गवळी), माजी उपसरपंच राजेश वारघडे,सरपंच वाडेबोल्हाई दिपक गावडे, संतोष गावडे,उद्योजक सागरशेठ भाडळे,गणेश सातव,मंगेश सातव, दत्तात्रेय कटके, बाळासाहेब सातव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
दाभाडे यांनी बाजी मारली..
वाघोली तालुका हवेली येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वाघोली मध्ये रामभाऊ दाभाडे गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना पातळीवर जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यात येत आहे. लवकरच हवेली तालुक्यातील अनेक दिग्गजांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
दिलीप वाल्हेकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, पक्ष संघटनेतील जिल्हा व तालुका स्तरावरील नेतेमंडळी व वाघोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली मध्ये जवळपास तीस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोमाने काम करण्यात येणार आहे.
समीर भाडळे
माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली