प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगंद्र कवाडे सर,पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या तत्काळ दिलेल्या आदेशावरून पिंपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठका घेण्यात आल्या.
देहूरोड शहरातील राजकीय घडामोडींना वेग, पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश उनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले , पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रामदास ताटे या पक्ष नेत्यांनी देहूरोड शहरात घेतलेल्या बैठकीत त्यांनी परशुराम दोडमणी यांची समजुत काढत त्यांना पक्ष व देहूरोड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाला स्थगती,
बैठकीतील घडामोडी बद्दल प्रेस मीडियाला मिळालेल्या माहिती प्रमाणे पिंपल्स रिपब्लिकन पक्षाच्या देहूरोड शहराध्यक्षपदी परशुराम दोडमणीच विराजमान असतील .पक्षात कुणीही त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही. असे बैठकीत ठरल्याचे समजते,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*