प्रेस मीडिया वृत्तसेवा : पुणे :
राज्य शासनाने धार्मिक स्थळ सुरू करण्याचे आदेश दिल्याने रोशन मस्जिद भवानी पेठ येथे पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.सीरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी यांनी पेढे वाटप करून शासनाचे आभार व्यक्त केले. मशिदीत नमाजासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले की शासनाने दिलेल्या सर्व नियमाचा काटेकोर पालन करून आपण दररोज पाच वेळा होत असलेल्या नमाजासाठी उपस्थित राहावे. अल्ला चरणी आम्ही प्रार्थना करतो की सबंध देशातून कोरोना हा पूर्णपणे संपावा. अल्लाह चरणी आम्ही प्रार्थना करतो की सर्वांचे जीवन आनंदाने जावे व कोरोना या रोगातून संपूर्ण मानव जातीला मुक्ती मिळावी.