प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
मित्राच्या पत्नीची अश्लील छायाचित्र तयार करून ते व्हाट्सअपवर पाठवणाऱ्या एका होमगार्डला बारामती पोलिसांनी अटक केली. मूळ छायाचित्रात छेडछाड करून त्याने अश्लील छायाचित्रे तयार केली होती. परंतु बारामती पोलिसांनी हायटेक तपास करीत आरोपीला अटक केली.
अभिजीत विजय हटकर असे अटक करण्यात आलेल्या होमगार्डचे नाव आहे. संबंधित महिलेने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पतीची आणि आरोपीची ओळख होती. यातून आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरी अनेकदा आला होता. त्यातूनच त्याची फिर्यादी सोबत ओळख झाली होती. आरोपीने तिचा मोबाईल नंबर घेतला होता. आरोपीने फिर्यादी महिलेची काही छायाचित्रे सोशल मीडियावरून घेतली आणि त्यामध्ये छेडछाड करून अश्लील इमेज तयार केली.
त्यानंतर झाली ही छायाचित्रे फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर पाठवली. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.