प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे.....
पुण्यातील कल्याणीनगर परिसरातून एका मसाले व्यावसायिकाच्या गाडीतून ९७ लाख रुपये घेऊन चालकाने पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्यावसायिक लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरला होता. हीच संधी साधून चालकाने गाडीत असणारी रोख रक्कम सोडून पळ काढला
*मार्केट यार्ड मधील एका ५० वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली असून त्यानुसार कारचालक विजय माधव हलगुंडे वय 22, रा. कात्रजकोंढवा रोड याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*
भोसरी....
*अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून २ लाख ३५ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत भोसरी एमआयडीसीतील सायनाक हायड्रोलिक्स कंपनीत घडली*
*सुरेंद्र नारायणराव सायनाक वय ६५, रा. चिंचवड यांनी या प्रकरणी गुरुवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली*
दिघी....
*बोपखेल येथे एसटी टेलिमीडिया ग्लोबल डेटा सेंटर्स इंदिरा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी १८ लाख ६२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना १० जून रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या कालावधीत घडली.*
*संजय रामचंद्र जाधव वय ४४ रा. नेहरूनगर,पिंपरी यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.*
सांगवी....
*चक्क नगरसेवकाची ची लूट केली मुलगी आजारी आहे असे सांगून तिच्यावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून नगरसेवकाला आर्थिक गंडा घालणाऱ्या ठगाला सांगवी पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. सुरज वाघ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.*
*भाजपचे नगरसेवक अंबरनाथ चंद्रकांत कांबळे वय ४९, रा. पिंपळे गुरव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.*
निगडी....
*सार्वजनिक उघड्या ठिकाणावर लघुशंका करण्याच्या कारणावरून भांडणे करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार प्राधिकरण पोलीस चौकीच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर, निगडी येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.*
*राम विजय जाधव वय २२, स्वप्निल गौतम कांबळे वय ३०, सोहनलाल ओम प्रकाश पिंपला वय३२ शाहिद रशीद शेख वय २१ सर्व रा. आकुर्डी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे*