प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून येत आहे. पुण्यामध्ये मध्ये आज पेट्रोलची किंमत 111.58 पैसे इतकी आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर....
डिझेलचा दर प्रति लिटर 100.891पैसे आहे. आता पेट्रोल 34 पैशांनी महाग झाले आहे. तर डिझेल 37 पैशांनी महागले आहे. पावर पेट्रोल 115.27 पैसे आहे. पेट्रोल 130 रुपये प्रती लिटरपर्यंत जाऊ शकते असं बोलले जात आहे. महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडत चालले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. या महिन्यात केवळ 12 दिवसांत पेट्रोल दर 3.48 पैशांनी महागले आहे, तर डिझेल दरात 4.04 पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.
दररोज सकाळी 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने खनिज तेलाचे दर वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढीचा कल आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 80 च्या जवळ पोहोचली आहे. येत्या काही आठवड्यांत देशांतर्गत बाजारात पेट्रोलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*