प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे वाकडेवाडी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) आणि खेड सेझ १५% टक्के परतावा धारक शेतकरीयांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक कार्यालय , एम . आय . डी . सी . वाकडेवाडी , पुणे येथे गुरुवार दिनांक : २८/१०/२०२१ रोजी पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले .
या ठिकाणी हरीश भाई देखणे( महाराष्ट्र प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) संगीताताई आठवले (प.महा.महिला अध्यक्ष री पा ई ),सत्तार भाई शेख , प महा उपाध्यक्ष श्रमिक ब्रिगेड, री पा ई, शकुर भाई शेख, अजीज भाई शेख,सुरेखाताई गोतारणे,व आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्तार भाई शेख यांनी प्रेस मीडिया शी संवाद साधताना अशी माहिती दिली की शेतकरी हा अन्नदाता आहे त्यांच्या जमिनीचा परतावा मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा देत रहाणार
आंदोलनातील प्रमुख मागण्या....
( १ ) खेड सेझ प्रकल्पातील १५% टक्के परतावा प्रश्न त्वरित मार्गी लावावा .
२ ) १५%टक्के परतावा प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री , एम.आय.डी.सी. मुख्य कार्यक अधिकारी , के.ई आय.पी.एल. प्रतिनिधी , के.डी. एल . प्रतिनिधी आणि १५ टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी , त्वरित संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा .
. ३ ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी .
४ ) खेड सेझ प्रकल्पाचे सर्वेसर्वा उद्योजक बाबा कल्याणी यांनी शेतकन्यांच्या केलेल्या फसवणुकी संदर्भात चौक करावी व कारवाई व्हावी .
५ ) खेड सेझ प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पॅकेजची पूर्तता व्हावी .
६ ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी कडे हस्तांतरित होणाऱ्या जमिनीचा व्यवहार शासकीय पातळीवरच व्हाव पातळीवर होऊ नये .
( ७ ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे हस्तांतरित होणारी जमीन शासनाने एम . आय . डी . सी . मार्फत ताब् विकसित प्लॉट किंवा शासकीय दराच्या चारपट दराने मोबदला द्यावा .
८ ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी के.ई. आय.पी.एल. कंपनी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करार त्वरित रद्द करण्यात यावा . ९ ) खेड सेझ प्रकल्पासाठी २००८ मध्ये जमीन संपादन झालेले आहे . सेझ कायदा रद्द करण्यात आला आहे . याशिवाय दिलेल्या पाच वर्षाच्या मदती प्रकल्प उभा राहिला नाही . त्यामुळे संपादित जमिनीत मूळ शेतक - यांना त्यांच्या विनामोबदला परत कराव्यात . ( १० ) खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या नावे हस्तांतरित होणारी जमीन ही शेतक - यांच्या पसंतीची असावी . ( ११ ) खेड डेव्हलपर्स लिमिटे कंपनी बरखास्त करावी . खेड सेझ १५ टक्के परतावा प्रश्न गेली १२ वर्षे प्रलंबित असून या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री , एम . आय . डी . सी . मुख्य कार्यकारी अधिकारी , के.ई. आय.पी.एल. प्रतिनिधी , के . डी . एल . प्रतिनिधी , पंधरा टक्के परतावा धारक शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त मीटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावावा .
*महत्त्वाची टीप*
: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे येत्या सात ( ७ दिवसात ) दिवसात जर आयोजनाबाबतचा कोणताही ठोस निर्णय झाला नाही . व तसे लेखी मिळाले नाही तर दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजे शुक्रवार दिनांक ५/११/२०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर काळे झेंडे दाखवून / निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी . त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाचे असेला अशा विविध प्रकारच्या मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या