पुणे बिबेवाडी चैत्रबन परिसरातील घटना
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे : मित्रांसोबत चौकात खेळत असताना काच फुटल्याने पप्पा मारतील या भीतीपोटी नऊ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला आहे. बिबेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३६वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
संगोपनातील एक महत्व
आज पालकांसाठी एक विशेष म्हणजे मुलांकडून चुका होत असतात कधी कधी मुलांना प्रेमाने समजूत घातली पाहिजे की जर तुझ्या हातून काही वेळा चुका झाल्या तर तू घाबरू नको सत्य काय ते अगोदर घरी येऊन सांग आम्ही तुला मारणार नाही, आपण ती चूक दुरुस्त करू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा नऊ वर्षीय मुलगा चैत्रबन वसाहत परिसरात खेळत होता. यावेळी चुकून त्याच्या हातातून काच फुटली. दरम्यान काच फुटल्याने पप्पा मारतील म्हणून नऊ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला. त्याच्या आई-वडिलांनी संपूर्ण परिसरातB याचा शोध घेतला परंतु तो सापडून आला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली.