वरिष्ठ गट महिलांच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आझम कॅम्पस मैदान सज्ज



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ गट महिलांच्या एक दिवसीय क्रिकेट  सामन्यांसाठी आझम कॅम्पस मैदान सज्ज झाले आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ पासून पुण्यात १५ सामने होणार असून त्यातील ५ सामने आझम कॅम्पस मैदानावर होणार आहेत. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ इनामदार तसेच आजम स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक गुलजार शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या निकषांनुसार आझम कॅम्पसचे व्ही.एम.गणी स्पोर्ट्स पॅव्हेलियन तयार करण्यात असून या पातळीवरचे क्रिकेट सामने प्रथमच या मैदानावर होत आहेत.

31 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड आणि मुंबई यांच्यातील सामना सकाळी नऊ वाजता होणार आहे. एक तारखेला मुंबई आणि तामिळनाडू, तीन तारखेला उत्तराखंड आणि चंदिगड, सहा तारखेला ओडिशा आणि रेल्वे यांच्यातील सामना सकाळी नऊ वाजता होणार आहे.

आझम कॅम्पसने नेहमीच शिक्षणाबरोबर खेळाला महत्व दिले असून महिला सक्षमीकरणाचे उद्दीष्ट साध्य केले आहे, अशी भावना महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी व्यक्त केली

Post a Comment

Previous Post Next Post