प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :
पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे.
मात्र, राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झालीबंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.