प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्मितीकडे वळल्या आहेत. मात्र अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणा-या मूलभूत सोयी सर्वत्र उपलब्ध नसल्याने वाहन धारकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढ होत असल्याने अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
सोसायटी कडून पार्किंग मध्ये चार्जिंग पॉईंट काढून दिला जात नाही. दोन ते तीन मजल्यापर्यंत राहणारे काहीजण वायर अंथरून चार्जिंगची तात्पुरती सोय करतात. पण त्या पेक्षा उंच इमारतीमध्ये राहत असलेल्या नागिरकांनी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग कशी करायची. करंट बसण्याची, आग लागण्याची भीती असल्याचे सोसायटी कडून कारण दिले जाते. सोसायटीच्या पार्किंग मध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असा सूर इलेक्ट्रिक वाहन धारकांमधून उमटत आहे.
मल्टिनॅशनल कंपनीत अभियंता म्हणून काम करणारे आनंद शिंदे म्हणतात, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे हे वाढत्या इंधन दरवाढीवर चांगला पर्याय आहे. परंतु अनेक नागरिक यासाठी पसंती देत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण देखील होत नाही. ही वाहने पर्यावरणपूरक आहेत. इलेक्ट्रिक वाहनात काही बिघाड झाला. तर ती दाखवायची कुणाला. कारण इलेक्ट्रिक वाहनांची सर्व्हिस सेंटर सर्वत्र उपलब्ध नाहीत. बॅटरी खराब झाली अथवा अन्य कारणामुळे गाडी बंद पडली तर आहे त्याच जागी लावावी लागते,. तिथून ती उचलून अथवा चार्जिंग करून नेहल्या शिवाय पर्याय नाही. चार्जिंग होणे शक्य नसेल तर उचलून घेऊन जाणे जिकरीचे होईल.