प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख ;
माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि भाजप प्रणीत नव भारतीय शिव वाहातुक संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफत शेख यांनी सोशल मीडिया वर सांगितले की, अल्प संख्याक मंत्री नवाब मलिक साहेब सतत ( NCB ) नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो ला कसे लक्ष्य करत आहेत आणि कुठे तरी ते आपल्या जावयाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि नवाब मलिकांच्या सांगण्यावरून वक्फ बोर्डाची जमीन कशी विकली जात आहे. त्यावर ते का बोलत नाही, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणा बद्दल त्यांना चिंता आहे परंतु त्याच्या मतदारसंघात तरुण पिढी व्यसनी होत आहे त्याची त्यांना चिंता नाही, त्यांच्या स्वतःच्या मतदार संघात अमली पदार्थ कशी विकली जातात आणि खरेदी केली जातात आणि अनेक मुस्लिम मुले ड्रगच्या व्यसनाला बळी पडतात. त्या बद्दल ते का बोलत नाहीत शाहरूख खान चा मुलगा कुठल्या धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास गेला नव्हता तो , तो क्रूझ वर होता,आणि त्य ठिकाणी काही चांगले कृत्य होत नाही,
फर्जीवडा म्हणणारे च स्वतः फर्जी वडा निघतील जर निःपक्ष चौकशी झाली तर,वक्फ महा मंडळाच्या जागा कशा पद्धतीने विकलेजात आहे त्याची चौकशी करावी असा घणघणात हाजी अराफत शेख यांनी शोषल मिडीयाच्या माध्यमातून नवाब मालिकांवर केला आहे. एक प्रकारे हाजी अरफत शेखने नवाब मलिक यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.