प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
आज दिनांक 05.10.2021 रोजी दुपारी 12 वाजता ऐतिहासिक सुभाष चौक देहूरोड येथे काल दिनांक 04.10.2021 रोजी उत्तर प्रदेशातील एका भाजप नेत्याच्या मुलाने हक्कांसाठी लढत असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना लखीमपुर येथे भरधाव वाहनाने चिरडले त्यामध्ये 8 शेतकरी मरण पावले त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या महासचिव मा . प्रियांका गांधी या जात असताना त्यांच्याशी बेजबाबदार वर्तन करणाऱ्या भाजप सरकारचा देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष मा . हाजिमलंग काशिनाथ मारीमुत्तु यांच्या प्रमुख नेतृत्वात देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला .
यावेळी मृत पावलेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली . त्याच प्रमाणे भाजप सरकारच्या विरोधात देहूरोड तलाठी आरती ताई खरे व देहूरोड पोलिस ठाणे पोलिस हावलदार मा . जगताप साहेब व देहूरोड पोलिस नाईक टिळेकर साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले . यावेळी उपस्थित असलेले किरण कडू साहेब ( पी एस आय एस बी हेड पुणे ) , पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ . रानीताई पांडीयन , कार्याध्यक्ष दीपक सायसर , उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी , माजी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे , मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख , सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव , संभाजी पिंजण , विल्सन पालीवाल , सुनील कंदेरा , दीपा प्रकाश जगले , बबन तोंपे , व्यंकटेश रामणारायण , भारत मारीमुत्तु , आय्यप्पा मारीमुत्तु , आसिफ सय्यद , सलीम सय्यद , जावेद शेख , कृष्णा अवदूत तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते