प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे....
मागील काही दिवसांपासून पीएमपीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशांना लक्ष करून त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू चोरून नेण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. पीएमपीएल बसमध्ये चढत असताना दोन ज्येष्ठ महिलांजवळी मोबाईल व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
*वाकड*
हॉस्पिटल समोर लॉक करून पार्क केलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने अवघ्या तासाभरात चोरून नेली. ही घटना शनिवारी दुपारी बारा ते एक वाजताच्या कालावधीत थेरगाव येथे घडली.
रोहित मधुकर वाघ वय २४ रा. तापकीर चौक, काळेवाडी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*सांगवी*
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली.
कृष्णा सुधाकर छडीदार वय २७, रा. कृष्णा चौक, नवी सांगवी यांनी याप्रकरणी रविवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*चाकण*
एका तरुणाने आपल्या मुलीसोबत पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे घडली.
सुभाष लक्ष्मण धामणकर वय ५३, रा. उर्से, ता. मावळ यांनी याप्रकरणी रविवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू बापू पवार वय ४८ पंडित बापू पवार वय ४६, आशुतोष खंडू पवार वय २०, तिघे रा. खालुंब्रे, ता. खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*पिंपरी*
अण्णासाहेब मगर स्टेडियम पिंपरी येथील गार्डन जवळ पार्क केलेल्या कारची काच फोडून कार मधून अॅपल कंपनीचा आयपॅड मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना ७ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते दहा वाजताच्या कालावधीत घडली.
टी एन उमामहेश्वरन वय ५९ रा. औंध यांनी याप्रकरणी रविवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.