क्राइम न्यूज; ठळक घडामोडी पुणे पिंपरी चिंचवड शहर क्राइम बातम्या संक्षिप्त.... मध्ये



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुणे : मार्केटिंगची नोकरी करणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या आमिषाने लॉजवर नेले. तेथे कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर ही घटना घडली. 

याप्रकरणी उरुळी कांचन येथील २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार धनंजय जाधव नामक व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे

*लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाट परिसरात झुडुपात फेकलेल्या अवस्थेत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अजित सणस यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे*

तळेगांव....

*तळेगाव एमआयडीसी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी अपघात झाले. या दोन्ही अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवारी  संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.*

*संभाजी गंगाराम गाडे वय ३८ रा. सुदुंबरे, ता. मावळ असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी किशोर गंगाराम गाडे वय ३१, रा. सुदुंबरे, ता. मावळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*

हिंजवडी....

*६८.४९लाख रूपये घेऊन देखील फ्लॅटचा ताबा किंवा नोंदणी न केल्यामुळे सहा जणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८, २०१९ आणि २०२० या कालावधीत प्रिस्टिन होरिझोन कं ऑफिस, हिंजवडी, ता. मुळशी येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी योगिता विमल दास वय ३८ रा. कस्पटे वस्ती, वाकड यांनी शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक ओमप्रकाश अगरवाल, मोना अगरवाल व त्याचा भाऊ, शुभम अगरवाल व कंपनीचे मॅनेजर आणि किरण कुंभारकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे*

रावेत......

*पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी रावेत येथे करण्यात आली.

करण रतन रोकडे वय २३ रा. रोकडेवस्ती, चिखली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शुभम कदम यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे*


*जाहीराती व बातम्यांसाठी संपर्क 9975971717*

Post a Comment

Previous Post Next Post