प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
देहू रोड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पक्षाचे सक्रिय युवा कार्यकर्ते श्री समीर सत्तेलू यांची निवड व्हावी असा ठराव पक्षाने केला सदर ठराव पक्षात गेली तीस वर्षापासून काम करत असलेले कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक देहूरोड पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सर्वानुमते श्री समीर सत्तेलू यांचे नाव निश्चित करण्यात आले तसा ठराव मावळ तालुक्याचे आमदार श्री सुनिल अण्णा शेळके व जिल्हा युवक अध्यक्ष श्री सचिन घोटकुले युवक तालुकाध्यक्ष श्री सुनील दाभाडे यांना देऊन समीर सतेलु यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र द्यावे अशी मागणी देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली याबाबत मावळ तालुक्याचे आमदार श्री सुनील आण्णा शेळके यांची देहूरोड शहर राष्ट्रवादी पक्षाने तीन वेळा भेट घेतली या भेटीदरम्यान देहूरोड शहराचा ठराव श्री समीर सतेलु यांच्या नावाने ठराव संमत झाला असेल तर नियुक्ती पत्र देण्यास काही हरकत नाही असे आमदारांनी त्या वेळी सांगितले होते.
दरम्यान आशिष बंसल व त्यांचे समर्थकमंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदासाठी इच्छुक झाले त्यामुळे देहूरोड शहरामध्ये चर्चा रंगू लागल्या,शहराचे वातावरण चर्चामय झालेले होते,समीर सत्तेल भेगडे समर्थक व आशिष बंसल घोटकुले व दाभाडे समर्थक अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे देहूरोड करांचे लक्ष लागून होते,?
या रस्सी खेच मध्ये शेवटी आखीर आशिष बन्सल यांनी बाजी मारली ,आशिष बंसल यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून अखेर देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखविण्यात आली यावरून असे स्पष्ट होते की देहूरोड शहरात ज्यांनी पक्ष टिकून ठेवला कठीण काळात पक्षाला साथ दिली आशा सर्वांच्या भावनांना ठेच पोचवून त्यांना दाबण्याचा तालुक्यातून प्रयत्न होत आहे अशी जोरदार कुजबुज सुरू झाली आहे .
तर दुसरीकडे जुळवाजुळव ची सुरवात करत अशी चर्चा होत आहे आशिष बंसल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस देहूरोड शहर अध्यक्षपदी निवड म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांला पक्षा कडून दिलेली ताकत आहे गट तट करण्या पेक्षा नवनिर्वाचित युवक शहरअध्यक्षाच्या मार्गदर्शना खाली देहूरोड मध्ये युवक संघटन मजबूत करण्यास मदत होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रधमच आगरवाल समाजातील एक नावाजलेल्या युवकाला एवढी मोठी जवाबदारी दिली आहे त्या मुळे व्यापारी वर्गातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे असे ही बोलले जात आहे, तर दुसरी कडे अशी ही चर्चा होताना दिसत आहे, आगामी होणाऱ्या झेडपी निवडणुकीत पवन मावळ गटात देहूरोड युवक अध्यक्ष नियुक्तीची पुनरावृत्ती होईल का ? अशी कुजबूज ही देहूरोड शहरामध्ये होऊ लागली आहे ।