पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख :

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समित्यांवर संपूर्ण बहुमत असल्याने भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले. आठही समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली. भाजप वगळता कोणत्याही पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. ‘फ’ प्रभागात बंडखोरी केलेल्या भाजपच्या अश्विनी बोबडे यांनी यामध्ये माघार घेतली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवारी) निवडणूक प्रक्रिया झाली. पालिकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सात प्रभाग अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांचेच अर्ज आले होते. तर, ‘फ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी भाजपच्या दोघांचे उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी अश्विनी बोबडे यांनी माघार घेतली. त्यामुळे आठही प्रभाग अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली.

Post a Comment

Previous Post Next Post