प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड : देहूरोड विकास नगर किवळे परीसर प्रभाग क्रमांक १६ अर्चना ताई राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड महिला उपाध्यक्षा आपल्या प्रभागात स्वतः फिरून नागरिकांच्या समस्यांना नेहमी प्रमाणे सोडवत असताना आज सकाळी त्यांना मैत्रीनीचा फोन कॉल आला व त्यांनी सांगितले की देहूरोड विकासनगर मध्ये एक मुलगी अनाथ आहे तिला शिकायचं आहे, पण परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही . हे सर्व ऐकताच अर्चना ताईनी तिला दत्तक घेतलं व तिचे संपूर्ण शाळेची फी भरून टाकली .. या वेळी वर्ग शिक्षिकाने आणखीन एक अनाथ मुलगी बद्दल सर्व माहिती दिली. हे ऐकून अर्चना ताई राऊत म्हणाल्या.. " शिक्षण महत्त्वाचेत " आहे म्हणून मी तिला पण शिक्षणासाठी दत्तक घेते ... या दोन्ही अनाथ मुलींचा शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करणाऱ्या अर्चनाताई राऊत यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.