प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील मोशीतील टोलनाका आज (शनिवार) पासून बंद झाला आहे. शुक्रवार १२ वाजल्यापासून टोल वसुली बंद केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रचंड अशी वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
ह्या टोल नाक्यावर चाकण, खेड, मंचर जुन्नर आंबेगाव,आळेफाटा,नगर, नाशिक, आदी ग्रामीण भागातून शहराकडे, तर पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्योगिक परिसराकडे जाणार्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते. औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरून जात होती. वाहनांची मोठी वर्दळ होती. टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी नेहमीच होत होती.
मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ ताटकळत थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. टोल नाक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे टोल वसुली आजपासून बंद झाली आहे.