क्राईम न्यूज : पिंपरी चिंचवड हादरले ; आकुर्डीत भर दिवसा सशस्त्रच्या धाक दाखवत टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड :आकुर्डी येथील किसन पांढारकर चाळ पंचतारानगर येथे टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला. हातात सशस्त्र देऊन धाक दाखवून भयभीत करत एकखाद्या  सिनेमात शोभेल असे  सिनेस्टाईल ने टोळक्याने महिलेच्या घरात घुसून तलवार व कोयत्याने तोडफोड करत रोख रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी दि.रात्री सात वाजताच्या सुमारास घडली.

अविनाश उर्फ तोत्या पांढारकर, बोन्या उर्फ बोनूप्रसाद हंसराज जयस्वाल, संपत उर्फ पप्प्या महाबली जयस्वाल, अजित छोटेलाल जयस्वाल, रुपेश रायसाहेब जयस्वाल, प्रतीक महादेव वाघ, आदित्य संतोष जयस्वाल सर्व रा. सुभाष पांढारकर चाळ, आकुर्डी अशी गुन्हा दाखल झालेल्या टोळक्याची नावे आहेत. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून हातामध्ये तलवार व लोखंडी कोयता घेऊन तलवारीने खिडकीची काच फोडली. तसेच दहशत निर्माण करून फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पर्समधून दोन हजार शंभर रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post