प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
मावळ सोमटणे फाटा : मनसे अध्यक्ष मा. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पवन मावळ व देहूरोड शहर कार्यकर्ता आढावा बैठक सोमाटने फाटा येथे पार पडली.
ज्यामध्ये पक्ष संघटन,आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका त्याचबरोबर अनेक पक्ष प्रवेश देखील घेण्यात आले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये उत्तम कामं केलेले व निवडूण आलेले सदस्य, उपसरपंच व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला, व भविष्या मध्ये पक्षाची भूमिका कश्या पद्धतीने समाजामध्ये काम करावं व भविष्यामध्ये पक्ष वाढीसाठी ज्या ज्या गोष्ठी कराव्या लागतील त्या करण्याची तयारी दर्शवली, याचं मार्गदर्शन पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड रवींद्र गारुडकर साहेब यांनी केलं..
कार्यक्रमा साठी आवर्जुन अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली त्याच प्रमाणे तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहीले प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र गरुडकर,सुशील पायगुडे,पांडुरंग असवले,अशोक कुटे,मंगेश खराडे, संदिप पोटफोडे,संतोष मोदले,बबन आलम,पौरस बारमुख,विजय भानुसघरे, जॉर्ज दास,मलिक शेख,असिफ सय्यद, हसन शेख, साबीर शेख, हुसेन शेख,मंगेश खराडे,लक्ष्मण पिंपळे,महेंद्र शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रामदास येवले, भरत बोडके,मोझेस दास,निरंजन चव्हाण यांनी केले होते तर सुत्र संचालन दशरथ येवले यांनी केले.