देहूरोड छावणीत खड्ड्यांचे साम्राज्य
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहुरोड शहराच्या वतीने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जीव घेण्या खड्ड्यांच्या तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी थाळी नाद आंदोलन करण्यात आले. देहूरोड मध्ये हेच कळत नाही की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे आहेत. रोज अपघात घडत आहे, नागरीक त्रस्त झालेले आहेत, आणि छावणी प्रशासन झोपा काढत आहे, रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास वेळ नाही. इशारा देऊनही तसेच पत्रव्यवहार करूनही काम होत नसेल, तर मनसेची काम करून घेण्याची पद्धत सांगावे लागेल. येत्या २० दिवसात खड्डे तसेच नागरिकांच्या विविध समस्या कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सोडवले गेले नाही,तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र गारुडकर साहेब यांनी दिला..
यावेळी मनसे उपाध्यक्ष मोजेस दास,देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास,मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मलिक शेख , मोजेश दास,रामदास येवले,भरत बोडके,अशोक कुटे,सुशील पायगुडे,महेंद्र शिंदे,संजय शिंदे,निरंजन चव्हाण,विजय भानुसघरे,गणेश आहेर,अक्षय जाचक,संदीप पोटफोडे,नाथा पिंपळे,अमित बोरकर,रुपेश जाधव,संदीप साबळे,आरिफ सय्यद,हसन शेख,राॅबिज राजन तसेच महाराष्ट्र सैनिक आंदोलनास उपस्थित होते,