प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे घरकुल योजनेतील बंद आढळलेल्या १२४२ सदनिकांचे पुन्हा आज शनिवारी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पूर्वी ही सर्वेक्षण करण्यात आले होते, आज त्यामध्ये 721 सदनिका बंद तर 83 सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह वीस कर्मचारी यांनी ही तपासणी केली. ४३८ सदनिकांमध्ये सदनिकाधारक स्व:त राहत असल्याचे आढळून आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. या योजनेतील लाभार्थ्यांना १० वर्षापर्यंत सदनिका भाड्याने देता येत नाही, तसेच विक्री ही करता येत नाही. तरी भाडेतत्वावर धील्याचे आढळून आले आहेत,याचा अर्थ असा ही काढला जात आहे की बेगरजूंना सदनिका मिळालेली आहे म्हणून त्यांनी त्याचा लाभ न घेता भाडेकरू ठेवले आहे ,लाभधारकांच्या समवेत झालेल्या करारनाम्यात या सदनिकांचा वापर स्व:त राहण्यासाठी करावयाचा असल्याचे नमूद आहे. या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा लाभ रद्द करण्याची तरतूद असून त्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याचे निर्देश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना दिल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.