प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
संपूर्ण महाराष्ट्र बारीक नजरेने पाहत असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले. या निवडणुकांच्या लागलेल्या निकालातून महाविकास आघाडी सरकार बाबत नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला असल्याचे दिसून आले.त्याच बरोबर कोरोना काळ, अतिवृष्टी यांसारख्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कामाची कसोटी या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार होती. मात्र, या निवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाली आहे. भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २३ जागा जिंकल्या असल्या तरी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १७ जागा आणि शिवसेनेने १२ जागां जिंकल्या आहेत. म्हणाजेच महाविकास आघाडीने एकूण ४६ जागा ताब्यात घेतल्या आहेत.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.या कामाची पावती नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून सरकारला मिळाली. हीच पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही दिसणार आहे.असे संजोग वाघेरे म्हणाले,
वाघेरे म्हणाले की, मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राजकीय पक्षांचे आगामी भवितव्य समोर आले आहे.*
संजोग वाघरे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड) पुढे म्हणाले की, ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने यश मिळवत नागरिकांच्या मनातील स्थान पटवून दिले आहे. हाच विश्वास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत दिसून येईल. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. यांचे निकाल बुधवारी समोर आले.