महाराष्ट्र बंदच्या पाश्र्वभूमीवर पीएमपीएमएल बस सेवा देखील बंद



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

अनवरअली शेख :

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएमएल बस देखील बंद आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने कार्यालयात जावे लागत आहे. पुणे, पिंपरी चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएमएल बस देखील बंद आहे. पीएमपीएमएलच्या निगडी डेपोतील सगळ्या गाड्या सकाळपासून बंद आहेत.

उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात चार शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी  महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. बंदला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. दुकाने बंद ठेवली जात आहेत. नागरिकांकडूनही बंदला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post