प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पवारसाहेबांना लक्ष घालावे लागले. म्हणजे आम्ही केवढे समर्थ आहोत. दोन पवार, मध्येच रोहित पवार, अमोल कोल्हे याचा अर्थ असा आहे की पिंपरी-चिंचवड मध्ये आम्हाला हरविणे सोपे नाही. म्हणूनच स्वतः पवारसाहेबांना महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागत आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.खासगी कार्यक्रमासाठी आज शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते,
पुढे ते म्हणाले पूर्ण की भारत एक आहे. ही आमची विचारधारा आहे. आम्ही त्याच्याशी फारकत घेऊ शकत नाही. आमची युती समविचारी पक्षाशी होते. संभाजी ब्रिगेडने त्या त्या वेळी मांडलेल्या मतांची एक वाक्यता होणे शक्य नाही. मनसेसोबत युती होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची परप्रांतीयबाबतची भूमिका भाजपला मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला कंट्रोल करत नाही. पण, आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यामुळे त्या विचाराशी थेठ पणे विरोधाभास असे आम्ही करू शकत नाही