प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अनवरअली शेख :
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस लोणावळ्यापर्यंत धावणार आहे. निगडी ते लोणावळा या मार्गावर आज (शुक्रवार) पासून बस सेवा सुरु करण्यात आली.
निगडी ते लोणावळा या नवीन बसमार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात आज सकाळी १० वाजता उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला
उद्योग, नोकरीनिमित्त लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे शहरातून पिंपरी-चिंचवड शहरात येणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. पुणे ते लोणावळा या मार्गावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या फेर्या कमी होत असल्यामुळे , व मागील दिड वर्षा पासून पुणे लोणावळा लोकल रेल सगळ्यांकरिता अजून ही चालू झालेली नाही कोरोना मूळे, म्हणून लोणावळ्या कडून पुणे पिंपरी चिंचवड कडे येणाऱ्या प्रवाशांचे, कामगार,मजूर,व नोकरिधारक यांचे मोठे हाल होत आहेत. कामशेतपर्यंत असणारी पीएमपीएमएलची सेवा लोणावळ्यापर्यंत सुरू करण्याची प्रवाशांकडून वारंवार मागणी होत होती. याची दखल घेऊन निगडी ते लोणावळा हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहे.नागरिकांनी समाधान वेक्त केले आहेत,
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*