प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड एक प्रगतिशील शहर पण हे काय होत आहे चक्क शहरातील औद्योगिक क्षेत्रात मुख्य रस्त्यावर झाडें लावलीजात आहे, एमआयडीसी येथील मुख्य चौकातील रस्त्यावरील खड्डे प्रशासनाकडून बुजविले जात नाहीत. त्यामुळे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि उद्योजकांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला आहे..
भोसरी परिसर एमआयडीसी बालाजीनगर चौक फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत अध्यक्ष अभय भोर, उद्योजक वैभव जगताप, सोनू ओव्हरी, यश कानडे, वैभव कांबळे आणि उद्योजकांन तर्फे झोपण्याचा सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
बालाजीनगर चौकामध्ये पाणी साचते. खड्डा मोठ मोठे आहे. त्यामुळे अनेक वेळा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, औद्योगिक परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्गाती झालेली आहे आणि त्याची दुरुस्ती होत नाही. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. एमआडीसीमध्ये अनेक उद्योजक, कारखानदार, कामगारांची रहदारी असते. मालवाहू वाहने मोठ्या प्रमाणात पाण्या सारखे वाहत असतात, या ठिकाणी निकृष्ट डांबरीकरण केल्यामुळे रस्ते खराब झाले असल्याने महापालिकेने त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भोर यांनी केली आहे.