प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
आकुर्डी उर्दू माध्यमिक विद्यालयाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर चिटणीस इखलास सय्यद यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत अ क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १४ मधील आकुर्डी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय असून गेल्या वर्ष भरापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. राज्य शासनाने जाहीर केलेलय नियमानुसार इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु झाले असून विद्यालयात विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या या विद्यालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून संडास बाथरूमचे दरवाजे तुटले, कमोड देखील बंद आहेत. काही दरवाज्यांना आतून कडी नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या मुलींची फार कुचंबणा होत आहे. याबाबत पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात. ही कामे तातडीने करून मुले- मुलींची गैरसोय दूर करावी अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.