प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड : मालकाने पगार दिला नाही म्हणून मनात राग उफाळून आला म्हणून एका कामगाराने चक्क आपल्याच मालकाची गाडी जाळून टाकली ही घटना आज (रविवारी, दि. 3) चिंचवड येथे घडली.अंकित शिशुपाल यादव , सध्या रा. पिंपळे गुरव. मुळ रा. उत्तर प्रदेश) असे गाडी जाळणाऱ्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा मांजरी येथील गणेश उंदरे पाटील यांच्याकडे एप्रिल महिन्यापासून काम करत आहे. गणेश पाटील यांनी त्याच्या कामाचे पैसे दिले नाही, या कारणावरून अंकितने पाटील यांची दुचाकी पळवून आणली. त्यानंतर ती दुचाकी पिंपरी चिंचवड लिंक रोडवरील, चिंचवड येथील प्रदीप स्वीट या दुकानसमोर भररस्त्यात उभी करून पेटवली. दुचाकीला आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना आणि आग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी दुचाकीची आग विझवली. पोलिसांनी अंकित याला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.. .