प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड, पिंपरी व चाकण ,पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घर फोडीच्या घटना घडल्या. याप्रकरणी बुधवारी गुन्हे दाखल केले आहे. चार घटनांमध्ये चोरटयांनी १ लाख ९१ हजार २४१ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
काशीनाथ विनायक चौधरी वय ३० रा. देहूगाव, पुणे.यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व लॉक तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधून १ लाख रुपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
उद्यमनगर, पिंपरी येथील दिव्यम आय केअर नावाच्या दवाखान्यातून अज्ञात चोरट्यांनी डोळे तपासणी यंत्र आणि त्या यंत्राचा चार्जर चोरून नेला अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
चाकण पोलीस ठाण्यात आणखी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी बाळासाहेब नारायण पोखरकर वय ४८ रा. आंबेठाण रोड, चाकण यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तपास चाकण पोलीस करीत आहेत.