प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीमध्ये मनमानी कारभार चालू आहे. चुकीच्या पद्धतीने जनतेच्या हक्काच्या पैशांची उघडपणे लूट करून ठेकेदार हिताचे धोरण राबविण्याचा कारभार केला जात आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्यात आमचा विरोध कधीही नव्हता, नाही आणि नसेलही , मात्र मुलांना साहित्य देण्याच्या नावाखाली ठेकेदारांची घरे भरण्यास आणि जनतेच्या पैशांच्या होणा-या लुटीस तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष शाळा सुरू होत असताना टॅब खरेदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात गटनेते कलाटे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता पुढील महिन्यात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. असे असताना सूध्दा आता टॅब खरेदी विषयी चर्चा सुरु आहे.हे प्रकरण प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे नाही का?
वास्तविकपणे २०१९-२० यावर्षातच टॅब देणे गरजेचे होते. कोरोना काळात शाळा ऑनलाईन झाल्या. त्यावेळी या टॅबचा उपयोग झाला असता मात्र शाळा भरण्यास सुरुवात होणार आणि टॅब खरेदीचा घाट घातला जात आहे.
शिक्षण समिती खरंच काम करते..?
वास्तविक पटसंख्याबाबत विचारणा करूनही शिक्षण समितीकडून माहिती दिली जात नाही. तसेच महापालिका शाळेत शिकणारी मुले ही गरीब कुटुंब व प्रतिकूल परिस्थितीतून आलेली दिसतात. ऑनलाईन शिक्षणासाठी आपण त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे कि नाही हे देखील शिक्षण समितीने मागील २ वर्षात तपासले नाही.
मुलांना साहित्य देण्याच्या नावाखाली ठेकेदारांची घरे भरण्यास आणि जनतेच्या पैशांची होणारी लूट यास विरोध आहे. त्यामुळे टॅब खरेदी करताना शहर व विद्यार्थी हिताचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*