प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेत शहरातील सायकल प्रेमींमनी भरपूर प्रतिसाद देत चक्क शहरातील 3 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला. तीन गटात झालेल्या या स्पर्धेची सूरूवात निगडी भक्ती शक्ती चौकातून रविवारी सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून झाली. स्पर्धेनंतर झुम्बा, योगा कार्यक्रमात सहभागी होवून स्पर्धकांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच, स्पर्धेत 83 वयोवर्ष असलेल्या ज्येष्ठ स्पर्धक ही सहभागी झाले होते तर त्यांना सायकल भेट देण्यात आली.
शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आहे. शहरात सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढविण्याकरीता महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, सायकल मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सूरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे,तसे शहरात आता मात्र सायकल चालवन्याची संख्या वाढत आहे, नागरिकांनी या बाबतीत सहभाग दर्शववा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.
सायक्लोथॉन स्पर्धेचे स्वरुप राष्ट्रीयस्तराचे असून यामध्ये ५०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. यात लहान मुले, सर्वसाधारण गट तसेच सराव करणा-या खेळाडूंसाठी ७ कि.मी., १५कि.मी. आणि ७५ कि.मी. अंतराची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे अंतर पूर्ण करणा-या खेळाडूंचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महापालिका डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आलेली होती.
१ ते ३ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार नऊ थीम्सच्या आधारावर पिंपरी चिंचवड शहर महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला या मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या तीन दिवसीय महोत्सवात नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी लाभली. निगडी येथील रोटरी पूलाच्या अंडरपासमध्ये विद्यार्थ्यांनी थिम बेसीसवर वॉल पेंटींग पूर्ण केले आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सुदधा सहभाग घेतला.